19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रतक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचा दावा

तक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचा दावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : तक्रारदार महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

अशातच पोलिसांनी ७२ तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे.

पोलिसांनी ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असे जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केले आहे.

‘हर हर महादेव’ सिनेमावरून विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पूल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या