किनगाव : किनगाव पासुन कांही अंतरावरील पाटोदा या गावातील व्यक्ती दहिसर मुंबई येथुन स्वत:च्या वाहनात पास काढून व्यक्ती पाटोदा येथे आलेला होता. त्या व्यक्तीचे वय ५०ते ५५ वर्षे असून या व्यक्तीला अगोदर फुफ्फुसाचा आजार आहे. त्या व्यक्तीला आगोदर किनगाव येथील दवाखाण्यात तपासणीसाठी आणले होते. परंतु त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्यामुळे लातूर येथे हालविण्यात आले.
Read More कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एमआयटीतील 22 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण
त्या ठिकाणी त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली असता तो पॉझेटिव्ह निघालेला आहे़ नंतर २४ मे २०२० रोजी किनगाव येथील वैद्येकीयअधिकारी डॉ. प्रमोद सांगविकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वता डॉ़सांगविकर यांनी पाटोदा येथे जाऊन त्या कोरोना पॉझीटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेच्या १४ व्यंक्तींना पुढील तपासणीसाठी लातुर येथे पाठविलेले आहे, व पाटोदा हे गाव १४ दिवस शिलकरण्यात आले आहे. दररोज आरोग्यसेवक जाऊन पाटोदा येथील जनतेची तपासणी करतील.असे किनगाव प्राथमिक आरोग्ये केंद्राचे वैद्येकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगविकर यांनी दैनिक एकमतशी बोलतांना सांगितले़