इस्लामाबाद: कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या पाकिस्तानात एका गाढवाला जुगार खेळल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यान खान परिसरात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला ताब्यात घेतले. गाढवासोबत आठ अन्य संशयित व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले. या गाढवाचे नाव एफआयआरमध्ये दाखल होते.
रहीम यार खआन परिसरातील एसएचओ यांनी सांगितले, इतर संशयित व्यक्तींसह गाढवाचे नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आले होते. आरोपी गाढवाला पोलीस ठाण्याच्या बाहेर बांधण्यात आले आहे. पोलिसांनी या संशयित जुगार खेळणाऱ्या व्यक्तींकडून एक लाख २० हजार रूपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. हे जुगार खेळणारे गाढवाच्या धावण्यावर पैसे लावत होते. पोलिसांनी उचललेले हे पाऊल त्या परिसरातच नव्हे तर सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
Donkey arrested for participating in a gambling racing in Rahim Yar Khan. Eight humans also rounded up, Rs 120,000 recovered. https://t.co/RIULiecduw pic.twitter.com/1FipntTR60
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) June 7, 2020
डेविड डी यांनी लिहिले की, क्या बात है! हा गाढव खरंच स्मार्ट आहे. आश्चर्याची गोष्टच नाही पाकिस्तान हा गाढवांच्या निर्यातीत जगातील सर्वात मोठा देश आहे. पाकिस्तानच्या जवळपासही कोणी नाही. संदीप झाने लिहिले, जर अशाच प्रकारे गाढवांना अटक केली जात असेल तर रियासत ए मदीना जीडीपीवर आलेले संकट दूर करेल. सत्यम दत्ताने लिहिले, हा बिचारा गाढव चीन जाण्याच्या दिशेने, मी आशा करतो की हे चांगले काम करण्यासाठी असेल जसे पीपीई सूट, व्हेंटिलेटर इत्यादी.
पाकिस्तानातही सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनामुळे पाकिस्तानात एक लाखाहून अधिक रुग्णसंख्या पोहोचली आहे. तर आतापर्यंत दोन हजाराहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३४ हजार ३५५ लोक बरे झाले आहेत. जगभरात कोरोनामुळे लाखो लोक बाधित झाले आहेत तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही लाखोच्या घरात आहे.
Read More उलट सुलट चर्चेला उधाण : दुकानाला आग, डॉक्टरचा होरपळून मृत्यू