36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रकाही धक्के; तर काही ठिकाणी बालेकिल्ले मजबूत

काही धक्के; तर काही ठिकाणी बालेकिल्ले मजबूत

एकमत ऑनलाईन

मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी १६ जानेवारी रोजी झाले होते. निवडणुकांचे निकाल सोमवारी लागले. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का तर काही ठिकाणी त्यांचे बालेकिल्ले शाबुत राहीले. समाजसेवक म्हणून राज्यभर प्रसिद्ध झालेल्या अण्णा हजारे व पोपटराव पवार या दिग्गजांच्या विरोधातील बंड मात्र सपशेल फसले. राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या आदर्श गावांमध्ये अनुक्रमे अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या पॅनेलची मोठ्या मताधिक्क्याने सरशी झाली. राज्यात सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीचीच सरशी झाल्याचे चित्र असून भाजपची पिछेहाटच झालेली दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजपला पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीत हजारे यांचे निकटवर्तीयांनी बनवलेल्या ग्रामविकास पॅनलला सर्वच्या सर्व नऊ जागा मिळाल्या आहेत. हिवरेबाजारमध्येही तब्बल ३० वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

दुसरीकडे जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उगवते नेतृत्त्व रोहित पवार यांनी गड राखला. चौंडी साकत,खर्डा सारख्या बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. दुसरीकडे बलात्काराच्या आरोपाखाली वादात सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही परळी तालुक्यातील १० पैकी ८ ग्रामपंचायतींवर ताबा मिळवला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना मात्र धक्का बसला आहे. त्यांना आपल्या स्थानिक गाव कोथळीमध्ये विजय मिळवताना अक्षरक्ष: धाप लागली आहे. कोथळीत खडसे यांचे विरोधक चंद्रकांत पाटील यांनी ११ पैकी ५ जागा जिंकल्या तर खडसेंना ६ जागांवर विजय मिळवता आला. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील आदर्श सरपंच अशी बिरुदावली मिरवणा-या गेल्या २५ वर्षांपासून सरपंच असलेल्या पाटोद्याच्या भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा सर्व ११ जागांवर दारुण पराभव झाला असून त्यांच्या म्ुालीचाही पराभव झाला आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. नागपूरमधील रामटेक तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने कब्जा मिळवला. पारशिवनी तालुक्यातील सर्व दहा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात मात्र १८ पैकी १२ ग्रामपंचायतींमध्ये भाजपची बाजी झाली. नरखेड तालुक्यातील जलालखेडा, थडीपवनी, खैरगाव, अंबाडा, सायवाडा, महेंद्री, सिंजर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला.गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील २५ पैकी २४ ग्रामपंचायती भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात गेल्या. संगमनेर तालुक्यातही भाजपने मोठी मुसंडी मारली. नेवासा तालुक्यातील सोनई ग्रामपंचायतीत १३ जागा ंिजकत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे वर्चस्व कायम राहिले. संगमनेर तालुक्यालीत कणकवली ग्रामपंचायतीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना धक्का देत विखे पाटील यांच्या समर्थकांची बाजी झाली आहे.राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांचे वर्चस्व राहिले. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना धक्का बसला.

खानापुरात चंद्रकांतदादांचा दारुण पराभव
शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने सर्व विरोधकांना चारी मुंड्या चित केले.

औरंगाबाद जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवीन चेह-यांनी विजय मिळवला.

नाशिकच्या पालखेडमध्ये शिवसेनेला धक्का
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादीने १७५ तर शिवसेनेने १५७ तर भाजपने ११९ ग्रामपंचायती जिंकल्या. मात्र गेल्या १५ वर्षांनी सत्तेत असलेल्या पालखेडमध्ये भाजपने शिवसेनेला मोठा धक्का देत सर्व १३ उमेदवार विजयी केले.

लस दुष्परिणामाचा आकडा वाढला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या