27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपॅकेज वरून चांगले रॅपर गुंडाळलेले असते पण प्रत्यक्षात तो रिकामा खोका असतो-मुख्यमंत्री

पॅकेज वरून चांगले रॅपर गुंडाळलेले असते पण प्रत्यक्षात तो रिकामा खोका असतो-मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

पोकळ पॅकेज पेक्षा प्रत्यक्ष मदत महत्वाची : फेसबुक लाईव्ह संबोधनात जोरदार समाचार

मुंबई: केंद्राने करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पॅकेज जाहीर केले आता राज्य सरकारनेही तशाच स्वरूपाचे पॅकेज द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या फेसबुक लाईव्ह संबोधनात जोरदार समाचार घेतला. त्यांनी म्हटले आहे की अनेक पॅकेज जाहींर होतात. त्याला वरून चांगले रॅपर गुंडाळलेले असते पण प्रत्यक्षात तो रिकामा खोका असतो.

महाराष्ट्राने प्रत्यक्ष उपाययोजना करण्यावर भर दिला असून त्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. त्याच्या जाहींराती आम्ही करीत बसायचे काय असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या मागणीची हवा काढून घेण्याचा प्रयत्न आज केला.

Read More  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 80 आरोग्य सेवकांची कोरोना तपासणी

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राज्यातील जनतेला कोट्यावधी रूपयांच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी राज्य सरकारच्या खर्चाने पोचवण्यात आले असून त्यासाठी आत्तापर्यंत 85 कोटी रूपयांचा खर्च केला आहे. 3 लाख 80 हजार जणांना एसटीने आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यात आले आहे त्यासाठी 75 कोटी रूपये खर्च केले आहेत.

राज्यातल्या सगळ्याच नागरीकांना महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शेतकरी, मजुर, व सामान्य नागरीकांसाठी सरकार सतत काहींना काही करीत असताना पॅकेजचा वेगळा गजर करण्याची गरज काय असा सवालही त्यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या