23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeऔरंगाबादगुजराती नेत्यांसाठी असलेले सरकार जास्त दिवस टिकणार नाही

गुजराती नेत्यांसाठी असलेले सरकार जास्त दिवस टिकणार नाही

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : गुजराती नेत्यांसाठी असलेले सरकार जास्त दिवस टिकणार नाही. हे ब्लॅकमेल सरकार आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे जनतेचे सरकार नसल्याचे पटोले म्हणाले.

पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सोनिया गांधी यांच्याकडे गेले होते, म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो होतो असेही पटोले म्हणाले. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ‘आझादी गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. या यात्रेला ९ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. ही यात्रा औरंगाबाद जिल्ह्यात आली आहे. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली. या राज्य सरकारमध्ये मलाईदार खात्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचेही पटोले म्हणाले. सध्या देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आमची ही आझादी गौरव यात्रा सुरू असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.

सरकार लॉलीपॉप देत आहे
सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाडा, विदर्भात या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतक-यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. या मदतीवरून देखील नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली. या सरकारने शेतक-यांना चांगली मदत द्यायला हवी मात्र, हे सरकार लॉलीपॉप देत असल्याचे पटोले म्हणाले. शेतक-यांना प्रति हेक्टरी ७५ हजार मदत द्यायला हवी. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडू असेही पटोले यावेळी म्हणाले.

पाठीवर वार नाही करत
दरम्यान, येणा-या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र लढावे की नाही याबाबतचा निर्णय कार्यकर्तेच घेतील. आम्ही दोस्ती करतो. पाठीवर वार नाही करत असेही नाना पटोले म्हणाले. आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आला होता, हे लक्षात ठेवावे असेही पटोले म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या