27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसत्ता ओरबाडून घेतलेले सरकार; सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

सत्ता ओरबाडून घेतलेले सरकार; सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

एकमत ऑनलाईन

पुणे : हे ईडी सरकार आहे. साम, दाम, दंड, भेद असे काहीही करून सत्ता मिळवणारे हे सरकार आहे. ‘५० खोके ऑल ओके’वाले हे सरकार आहे. या सरकारची सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली नाही. सत्ता ओरबाडून घेतली आहे.

त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, हे दुर्दैव असल्याची खंत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. त्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर भाजपा मूळ मुद्यांना बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात त्यांनी केली.

देशभरात महागाई हा मोठा प्रश्न आहे. मात्र भाजपाची ही मोठी खेळी आहे. लोकांना मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातत्याने लोकांना भुलवत राहायचे ही त्यांची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘पोलिसांकडून चांगले काम’
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे पोलिसांकडून चांगले काम होत आहे. याकडे सामाजिक प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. महिला अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत असे त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या