23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाबॅडमिंटनमध्ये सुवर्णांची हॅट्ट्रिक; पुरूष दुहेरीतही सुवर्णपदकाची कमाई

बॅडमिंटनमध्ये सुवर्णांची हॅट्ट्रिक; पुरूष दुहेरीतही सुवर्णपदकाची कमाई

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : भारताने बॅडमिंटन पुरूष दुहेरीत इंग्लंडचा २१-१५, २१-१३ गेम्सने पराभव करत भारताला बॅडमिंटनमधील तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. भारताच्या सात्विक साईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंग्लंडच्या बेन लॅन आणि सिअन वेंडीचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

भारताच्या सात्विक आणि चिरागने पहिल्या गेममध्ये २१-१५ असा जिंकला. पहिल्या गेममध्ये इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीने सुरूवातीला सात्विक आणि चिरागच्या तोडीस तोड खेळ करत सामना नेक टू नेक ठेवला. मात्र पहिल्या गेमच्या दुस-या भागात भारताच्या चिराग आणि सात्विकने आघाडी घेत पहिला गेम २१-१५ असा जिंकला. त्यानंतर दुस-या गेममध्ये यजमान इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीने चांगली सुरूवात केली.

मात्र भारताने ३-२ अशी एका गुणांची आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने ही आघाडी दुस-या गेमच्या मध्यापर्यंत ११-१० अशी नेली. दुस-या गेममध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोडीने आक्रमक झुंजार खेळ करत भारताला मोठी आघाडी मिळू दिली नाही. मात्र दुस-या गेमच्या दुस-या हाफमध्ये चिराग आणि सात्विकने जोरदार खेळ करत आघाडी १७ -११ अशी वाढवत दुस-या गेमवर तसेच सामन्यावरही आपली पकड मजबूत केली. त्यानंतर चिराग आणि सात्विकने इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीविरूद्ध दुसरा गेम देखील २१-१३ असा जिंकत सामना आणि गोल्ड मेडल खिशात टाकले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या