Wednesday, September 27, 2023

देशमुख कुटुंबीयांकडून विलासबागेतील स्मृतीस्थळी भावपूर्ण आदरांजली

लातूर : राजकारणाला समाजकारणाचे माध्यम समजून सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करणारे लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती २६ मे, २०२० रोजी सकाळी सामाजिक अंतर पाळत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली. देशमुख कुटुंबीयांनी बाभळगाव येथील विलासबागेतील स्मृतीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले, आदरांजली अर्पण केली.

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनानिमित्त दरवर्षी २६ मे रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे सामूहिक आदरांजलीचा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जात असतो त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातील अनेक मान्यवर आणि सामान्य नागरिक येऊन आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण करीत असतात़ सध्या संपूर्ण जगावरच कोव्हिड-१९ चे संकट कोसळले आहे. या कोव्हिड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्य आणि देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

सामाजिक, वैयक्तिक आंतर पाळून या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत त्यामुळे एकत्रित लोक जमा होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७५ वी जयंतीदिनी बाभळगाव येथे सामुदायिक आदरांजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेऊन, सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन केले होते त्यामुळे मंगळवारी सकाळी प्रारंभी स्मृतीस्थळी फक्त देशमुख कुटुंबीयांनीच परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बाभळगाव येथील स्मृतीस्थळावर विनम्र अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.

या वेळी प्रारंभी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, माजी मंत्री
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, अदितीताई अमित देशमुख यांनी आंदराजली वाहिली. त्यानंतर सिनेअभिनेते रितेश विलासराव देशमुख, जेनेलिया रितेश देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, दीपशिखा धिरज देशमुख, अविर, अवान, रियान, राहिल, वंश, दिव्यांना यांनी स्मृतीस्थळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार व समाधीस्थळी पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली व विनम्र अभिवादन केले. त्यानंतर दिवसभरात राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार वैजनाथ श्ािंदे, माजी चेअरमन एस. आर. देशमुख, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, चेअरमन श्रीपतराव काकडे, व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, संभाजी रेड्डी, कालिदास माने आदींनी विलासबाग येथे जाऊन अभिवादन केले.

मांजरा कारखाना येथे ८५ जणांचे रक्तदान
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री व विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संस्थापक विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि़ २६ मे रोजी कारखाना साईटवरील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच कारखाना साईटवर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी ८५ व्यक्तींनी रक्तदान केले.

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीचे औचित्य सामाजिक अंतराचे पालन करून कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कारखान्याचे अधिकारी व कामगार तसेच सभासदांनी कारखाना कार्यस्थळावरील विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले तसेच या प्रसंगी कारखान्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी ८५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तदात्यांमध्ये कारखान्याचे संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी सहभाग घेतला. रक्त संकलनाचे कामकाज लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केले. या प्रसंगी कोरोना व्हायरस या होत असलेल्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन उपस्थितांनी केले.

या प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक सर्वश्री अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, धनराज दाताळ, सचिन शिंदे, सूर्यकांत पाटील, निळकंठ बचाटे पवार, ज्ञानेश्वर पवार, कैलास पाटील, नवनाथ काळे, शेरखान पठाण, बाबुराव जाधव, शंकर बोळंगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कामगार, कर्मचारी सभासद, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार, मजूर व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लातूर शहर युवक काँग्रेसतर्फे रक्तदान
कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण जग, देश आणि राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. कोरोनापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लातूरमधील नागरिक या परिस्थितीत आपली स्वत:ची काळजी घेऊन सर्वाना मदतही करीत आहेत. कोव्हिड-१९ पार्श्वभूमीवर राज्याच्या रक्तपेढीत तुटवडा निर्माण झाला असून सामाजिक जबाबदारी म्हणून लोकनेते विलासरावजी देशमुखसाहेब यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त संकटकाळी माझे योगदान या पार्श्वभूमीवर लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने आज २६ मे २०२० रोजी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या वेळी लातूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, लातूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे, अभिषेक पतंगे, जयदेव मोहिते, एम. एच. शेख, युनूस शेख, श्रीशैल गडगडे, सुनील वाले, गोविंद आलुरे, आकाश दुर्गे, राजू गवळी, दिनेश रायकोडे, मनदीप सवई, निखिल ओव्हाळ, गणेश ससाने, सुमित भडीकर, बाजीराव शिंदे, श्रीकांत गर्जे, अजय वाघदरे, काशिनाथ वाघमारे, अमजत चौधरी, असलम चौधरी, विश्वजित जाधव, चंद्रमणी कांबळे, यशपाल सूर्यवंशी, अकबर माडजे, दिनेश गोजमगुंडे, ख्वॉजापाशा शेख, बालाजी सोनटक्के, औदुंबर श्ािंदे, सूरज पांचाळ, यश रंगद आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या