Sunday, September 24, 2023

रेल्वे लोकोशेड जवळ बेवारस पाच महिन्यांची मुलगी सापडली

पूर्णा :- कोणीतरी अज्ञात महिलेने येथील रेल्वे लोकोशेड जवळ उभी असलेली श्रमिक गाडीचे शेवटच्या डब्याचे कपलिंगच्या हुकला एका पाच महिन्याची मुलीला पिशवीत टाकून अडकून सोडून गेली. खबर मिळताच रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन परभणी येथे शिशुपालन केंद्रात पाठविले.दरम्यान रेल्वे पोलीस चौकीत महिला पोलीस कर्मचारी नसल्याने सदर बेवारस मुलीला संभाळण्या साठी ड्युटी वरील रेल्वे पोलीस कर्मीना तारावरची कसरत करावी लागली शेवटी स्वच्छता विभागाच्या महिलेस बोलवून बेवारस मुलीस सांभाळण्यात आले

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने सगडीकडे शुकशुकाट असल्याचा फायदा घेत दि.१७ जुलै रोजी पहाटे पूर्णा येथील रेल्वे लोकोशेड कारखाना जवळ रिकामी उभी असलेली श्रमिक गाडीच्या शेवटच्या डब्याचे कपलिंगला कोणीतरी अज्ञात महिलेंनी पाच महिन्याची  चिमुकलीला पिशवीत टाकून अडकून पोबारा केला. सकाळी १०:०० वाजण्याच सुमारासे सदर चिमुकली रडत असल्याने शेजारी असलेली वेंकटी प्लॉट येथील रहिवाशांना पाहिले व रेल्वे पोलिसांना सदर माहिती दिली.

यावरून रेल्वे पो.हे.कॉ.ओमप्रकाश वडतकर व पो कॉ संदीप पत्रे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर चिमुकलीला ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांनी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात सदर चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करून परभणी येथील शिशुपालन केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रक्रिया होईपर्यंत रडत असलेली चिमुकल्या मुलीला संभाळण्या साठी पूर्णा रेल्वेच्या चौकित महिलां पोलीस कर्मी नसल्याने सदर रडत्या चिमुकलीला  रेल्वे पोलीसाना सभाळने अवघड जाऊ लागले होते शेवटी रेल्वे स्थानकाची साफसफाई करणारी कंत्राटी कामगार महिला रमाबाई किशन अहिरे यांनी या चिमुकलीला सांभाळून माणुसकी अजूनही जिवंत आहे म्हणून दाखवून दिले. दरम्यान सदर बेवारस चिमुकलिस(मुलीस) रेल्वे पोलिसांनी रुग्ण वहिनीनी परभणी येथील शिशु पालन केंद्र येथे पाठविले असून या सदर बेवारस मुली कोणी टाकली व त्याचे आई वडिलांचा शोध घेणे पोलिसना आव्हान आहे

Read More  मेक इन इंडिया : रक्षाबंधनला चीनला बसणार 4 हजार कोटींचा फटका

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या