23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुस्लिम तरुणीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, घातपाताचा संशय

मुस्लिम तरुणीशी विवाह करणारा हिंदू तरुण अचानक बेपत्ता, घातपाताचा संशय

एकमत ऑनलाईन

मुंबई : लव्ह जिहादवरून चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एका आंतरधर्मीय लग्नाला हिंदू संघटनांनी विरोध करून लव्ह जिहाद चालू असल्याचा आरोप केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आता श्रीरामपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

महिन्यापूर्वी मुस्लिम मुलीशी लग्न झालेला तरुण अचानक बेपत्ता झाला असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तर कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलिसांनी संशयित आरोपींना अटक केली असून बेपत्ता असलेल्या तरुणाची शोधमोहीम सुरू केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकरमधील दीपक बर्डे या तरुणाचे शहरातील एका मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या या नात्याला दोघांच्या कुटुंबियांचा विरोध होता. तरीदेखील दोघांनीही घरच्यांचा विरोध पत्करून महिनाभरापूर्वी लग्न केले. विवाह करून मुलीला घरी आणल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी दीपकला मारहाण करून मुलीला घरी घेऊन गेले होते.

मुलगी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे समजताच दीपकने नोकरी शोधण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून पुणे गाठले. पुण्याला जातो असे सांगून बाहेर पडलेला दीपक अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळे आता त्याच्या घरच्यांची चिंता वाढली असून त्यांनी श्रीरामपूर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. याशिवाय दीपक कुठे गेला, त्याच्यासोबत काय झालं, आता तो कुठे आहे?, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.

दीपकच्या वडिलांना त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या