26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रनागपूरात झोपडपट्टीला भीषण आग

नागपूरात झोपडपट्टीला भीषण आग

एकमत ऑनलाईन

नागपूर : बेलतरोडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणा-या महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. यामध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

महाकाली नगर झोपडपट्टीत सोमवार दि. ९ मे रोजी सकाळच्या सुमारास ही आग लागली. याठिकाणी बघ्यांची तुफान गर्दी असून अग्नीशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. अनेक घरेदेखील आगीत जळून खाक झाले आहेत. या झोपडपट्टीत जवळपास १६ वेळा मोठे आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण, आग नेमकी कशामुळे लागली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

नागपुरात तापमानाचा पारा ४५ अंशावर आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआय चौकात चालत्या सिटी बसला आग लागली होती. यामधून प्रवास करत असलेल्या ३० प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यापूर्वी देखील काही वाहने जळून खाली झाली होती. या कडाक्याच्या उन्हात झोपडपट्टीत लागलेली आग विझविण्याचे आव्हान अग्नीशमन दलासमोर असल्याची माहिती मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या