16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयअमरनाथ गुहेपर्यंत निघणार भूयारी मार्ग

अमरनाथ गुहेपर्यंत निघणार भूयारी मार्ग

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : बालटालहून अमरनाथला जोडणा-या मार्गावर पहाड भेदून भुयारी मार्ग काढला जाणार आहे. सीमा रस्ता संघटनेने या भूयारी मार्गाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून पुढील वर्षीच्या अमरनाथ यात्रेत थेट गुहेपर्यंत भाविकांना पोचता येणार आहे.

सुरुवातीला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्रोतांच्या कमतरतेमुळे काम मंद गतीने सुरू होते. यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने सप्टेंबरमध्ये रस्ता विकास, देखभाल आणि व्यवस्थापनाचे काम बीआरओकडे सोपवले. बीआरओने २९ सप्टेंबरपासून कामाला सुरुवात केली असून. बालटाल आणि पवित्र गुहेतील १३.२ किमीचे अंतर भूयारी मार्गातून होणारआहे.

भूस्खलन, वाहतूक कोंडी यातून मार्ग काढण्यासाठी हा भूयारी मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे भाविक एका दिवसाच्या आत बेस कॅम्पला पोहोचू शकतील.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या