22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रनेता फक्त पदाने नाही, कर्तृत्वाने मोठा होतो

नेता फक्त पदाने नाही, कर्तृत्वाने मोठा होतो

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटातला दसरा मेळाव्याचा वाद आता आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही गट आपणच शिवाजी पार्कवर मेळावा घेणार या मुद्यावर ठाम आहेत.

या सगळ्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे याही आपले मत व्यक्त करत म्हणाल्या, मला आठवतं, जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरून दिलदारपणे पवारांवर टीका करायचे.

विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार? सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात असतानाची एक आठवण सांगितली.

मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, हा सगळा वाद दुर्दैवी आहे. मुख्यमंत्रिपद मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असायला हवं. आमच्याही काळात दसरा मेळावा व्हायचा.

आमच्याविरोधात भाषणं व्हायची. आम्हीही उत्सुकतेने आमच्या विरोधात ते काय बोलतात, हे ऐकायचो. त्यामुळे नेता हा फक्त पदाने मोठा होत नाही, तर तो कर्तृत्वाने होतो. त्यामुळे मोठ्या पदावर बसणारा नेता दिलदार असावा. त्यामुळे सध्या जे सुरू आहे, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या