25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिकच्या अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

एकमत ऑनलाईन

  गोडाऊनवर एक कोटीचे खाद्यतेल जप्त

नाशिक : नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली असून शिंदे गाव-नायगाव रोडवरील एका खाद्यतेलाच्या गोडाऊनवर छापा टाकत एक कोटी १० लाख ११ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणा-यांवर पुन्हा एकदा अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. परिणामी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त पदार्थ विकणा-यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार नाशिक तालुक्यातील शिंदे गावाजवळील एका गोडाऊनवर छापा टाकण्यात आला आहे. लेबल दोष आणि तेलामध्ये भेसळ असल्याच्या संशयावरून ०४ ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या खाद्यतेलाचे नमुने सध्या तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित विक्रेता गोडाऊनमध्ये असलेले तेल हे उच्च प्रतीचे असल्याची जाहिरात करून नागरिकांना याकडे आकर्षित करीत असल्याचे समोर आले आहे. याच संशयातून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित गोडाऊनवर धाड टाकत कारवाई केली आहे. नाशिक तालुक्यातील शिंदे गावाजवळील नायगावरोडवरील माधुरी रिफायनर्स या कारखान्यावर छापा टाकून एक कोटी १० लाख ११ हजार २८० रुपये किमतीच्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे.

दरम्यान कारवाईनंतर संबंधित गोडाऊनमधील खाद्यतेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शिवाय सध्या अन्न व औषधच्या माध्यमातून अन्नसुरक्षा सप्ताहांतर्गत अन्नसुरक्षा विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती तसेच खाद्यतेलाचे नमुने तपासण्याची मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे.

दरम्यान अन्न सुरक्षा सप्ताहांतर्गत ही मोहीम हाती घेण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर शहरातील संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच तेथील खाद्यपर्थांचे नमुने हे तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने नायगाव रस्त्यावरील कारखान्यातील खाद्यतेलाच्या डब्यांवर लेबलदोष आढळून आला. लेबलवर केलेल्या दाव्यात फोर्टीफाईड खाद्यतेलाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र ‘पल्स एफ’चे सिम्बॉल नाही.

त्यामुळे ते खाद्यतेल फोर्टीफाईड नसल्याची दाट शक्यता असल्याने अन्नसुरक्षा विभागाने कंपनीतील वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यतेलाचे सात नमुने ताब्यात घेऊन कंपनीतील साठा जप्त केला आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, अमित रासकर, अविनाश दाभाडे यांनी विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या