28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपराभवानंतरही कधी माणूस संपत नाही

पराभवानंतरही कधी माणूस संपत नाही

एकमत ऑनलाईन

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काही दिवसांपूर्वीच भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवण्यात आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी उद्योजकांसमोर काही वक्तव्ये केली आहेत. रिचर्ड निक्सन यांचा हवाला देत, गडकरी म्हणाले की, जेव्हा कोणताही व्यक्ती पराभूत होतो, याचा अर्थ तो संपत नाही. मात्र जेव्हा तो स्वत: पराभव स्वीकारतो, त्याचवेळी तो संपतो. याचवेळी त्यांनी सध्याच्या वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीचा भाग होऊ नका,

असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखी एक मंत्र या कार्यक्रमात दिला. गडकरी म्हणाले की, जे ही कोणी व्यवसायात आहेत, सामाजिक कार्यात आहेत किंवा राजकारणात आहेत, त्यांच्यासाठी इतर माणसांशी त्यांचे असलेले संबंध ही सर्वांत मोठी ताकद आहे.

एखाद्याचे चांगले दिवस असोत वा वाईट दिवस असोत, जेव्हा तुम्ही कुणाचा हात हातात घेतला असेल म्हणजेच त्या माणसाशी मैत्री केली असेल तर तो हात सोडू नका, असा सल्ला यावेळी गडकरी यांनी उपस्थित उद्योजकांना दिला. प्रत्येक वेळी उगवत्या सूर्यालाच नमस्कार करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी श्रीकांत जिचकार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

नितीन गडकरी त्यांच्या तरुण वयात विद्यार्थी चळवळीत काम करीत होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते श्रीकांत जिचकार यांनी त्यांना चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करा, असे सांगितले होते. त्यावेळी श्रीकांत जिचकार यांना दिलेले उत्तर गडकरींनी या कार्यक्रमात सांगितले. त्यावेळी ते श्रीकांत जिचकार यांना म्हणाले होते की, मी विहिरीत उडी मारून मरून जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही.

कारण काँग्रेसची विचारधारा आपल्याला पसंत नाही. यावेळी बोलताना गडकरी यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन केले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, असा सल्ला गडकरींनी या उद्योजकांना दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या