27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्राइमहालकीत मेंढपाळ शेतकऱ्याची हत्या?

हालकीत मेंढपाळ शेतकऱ्याची हत्या?

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हालकी येथून २३ एप्रिल पासून बेपत्ता म्हणून पोलिस दफ्तरी नोंद असलेल्या नरसींग बाबुराव नरवटे (वय ५० वर्षे) या मेंढपाळ व्यावसाय करणा-या शेतक-यांचा २२ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास हालकी शिवारातील बोयणे यांच्या शेतातील बोअरचे पाणी साठविण्याच्या खड्यात कुजलेल्या अवस्थेत मृत्युदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून या संदर्भात शिरूर अनंतपाळ पोलिसात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हालकी येथील मेंढपाळ शेतकरी नरसिंग नरवटे हे २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीच्या गाडीवर आपल्या पत्नीला घराच्या कुलूपाची चावी सांगून गेले होते. मात्र गाडी चालवणारा कोण होता हे घरच्यांच्या लक्षात आले नाही. पत्नी, मुलगा यांनी त्यांचा नातेवाईकाकडे शोध घेतला मात्र मिळून येत नसल्यामुळे अखेर शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात ३० एप्रिल रोजी मयताचा भाऊ नारायण नामदेव नरवटे यांच्या फिर्यादीवरुन शिरुर अनंतपाळ पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली.

Read More

पोलिसाकडूनही याचा शोध सुरू होता. यामध्ये त्यांच्या संपर्कातील लोकांना बोलावून चौकशी करण्यात आली मात्र शोध लागत नव्हता. अखेर २२ मे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांची पत्नी मेंढरे पाण्यासाठी हालकी शिवारातील बोयणे यांच्या शेतातील बोअरच्या पाण्याच्या खड्याजवळ घेऊन गेल्या असता , खडयात उग्रवास येत होता. ही माहीती मयताच्या पत्नीने नातेवाईक व गावातील लोकांना व पोलिसांना कळवली.पोलिस निरक्षिक परमेश्वर कदम हे संपूर्ण ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अखेर पोलिस अधिका-यांनी ही माहिती वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर घातली. व पाहणी केली असता या मेंढपाळ शेतकºयांची क्रूर हत्या झाली असल्याची घटना असावी.

दरम्यान मृतदेह पूर्णसडून गेला असल्याने त्यांचा तपास करून गुन्हा उघडकीस आणणे पोलिसासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून यापूर्वी गावात कांही लोकासोबत अनेक वाद असल्यामुळे हा खून विश्वासात घेऊन अथवा सुपारी देवून केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असून पोलिस परिसरातील हालकी, गणेशवाडी, तळेगाव, उमरदरा या भागात पथक पाठवून आरोपीची माहिती घेत असल्याचे समजते.

याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ नारायण नामदेव नरवटे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यु गुन्हा नंबर ८ / २०२० कलम १७४ सीआरपीसी नुसार दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या