नवी दिल्ली : सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठवलेल्या नोटीसनंतर, केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेचे १ दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी माध्यमांना सांगितले की, आम आदमी पक्ष देशासाठी आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे आणि म्हणूनच त्याला चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी रविवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यावर पहिली प्रतिक्रिया देताना केजरीवाल यांनी रविवारी एजन्सीसमोर हजर होणार असल्याचे सांगितले.
सीबीआय आणि ईडीच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करणार : केजरीवाल
ज्या दिवशी मी दिल्ली विधानसभेत भ्रष्टाचाराविरोधात बोललो, त्यादिवशी मला माहित झाले होते की पुढचा नंबर माझाच असेल. केजरीवाल म्हणाले, सीबीआयने चौकशीसाठी सकाळी ११ वाजता सीबीआय मुख्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. खोटे पुरावे सादर करणे व न्यायालयात बनावट साक्ष दिल्याबद्दल सीबीआय आणि ईडीच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करणार असा इशारा केजरीवाल यांनी दिला.