24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeवीज कार्यालयात लावला लादेनचा फोटो

वीज कार्यालयात लावला लादेनचा फोटो

एकमत ऑनलाईन

फारुखाबाद : नवाबगंजमधील विद्युत विभागाच्या कार्यालयातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा आहे. या फोटोच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनचे जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ अभियंता असे वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, एसडीओ नवाबगंज यांच्याशी याबाबत बोलले असता, त्यांनी हा फोटो स्वत: कार्यालयात लावल्याचे मान्य केले. त्याचबरोबर कोणीही कोणालाही आदर्श मानू शकतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार्यालयातून काढून टाकण्यात आला आहे.

नवाबगंजमध्ये वीज विभागाच्या उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या भिंतीवर कनिष्ठ अभियंता जुनेद आलम अन्सारी आणि अनिल कुमार गौतम यांच्यासह उपविभागीय अधिकारी रवींद्र प्रकाश गौतम यांच्या फोटोला लागून ओसामा बिन लादेनचा फोटो लावण्यात आला होता.

वेटिंग रूमच्या भिंतीवर दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो पाहून कार्यालयात गेलेले लोक आश्चर्यचकित झाले. दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या फोटोवर जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता, तसेच उपविभागीय अधिका-याचे नाव लिहिले होते.

एका व्यक्तीने दहशतवादी ओसामा बिन लादेनचा भिंतीवरचा फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हायरल झालेला फोटो आणि व्हीडीओ पाहून भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मिश्रा मोनू यांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिका-यांपासून विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना दिली. ही बाब वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास येताच कर्मचा-यांनी फोटो काढून टाकला.

अधीक्षक अभियंता एस. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा नवाबगंजच्या कार्यकारी अभियंत्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या संदर्भात व्यवस्थापकीय संचालक व मुख्य अभियंता यांना कारवाईसाठी पत्र पाठविण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या