26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeनांदेडधर्माबादमध्ये अजगराने अख्खी शेळी गिळली

धर्माबादमध्ये अजगराने अख्खी शेळी गिळली

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यात एका अजगराने शेळीवर हल्ला करत पूर्ण शेळीच गिळंकृत केल्याची घटना घडली आहे. हा सारा प्रकार कॅमे-यात कैद झाला असून यामुळे पशुपालक व शेतकरी भयभीत झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असलेल्या चोंढी शिवारातील ही घटना आहे. ज्ञानेश्वर घंटेवाड हा शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेळया चारण्यासाठी चोंढी शिवारात गेला होता. शेतक-याच्या या शेळ्यांच्या खांडावर जंगलात असलेल्या एका भल्या मोठ्या अजगराने झडप मारली. अजगराच्या या झडपेत कळपातील एक शेळी सापडली. शेळीवर हल्ला करीत शेळीला गिळण्याचा प्रयत्न या अजगराने केला.

या अजगराच्या तावडीत आपली शेळी सापडल्याचे ज्ञानेश्वर घंटेवाड या शेतक-याला निदर्शनास आले. या परिसरात झाडे झुडपांची संख्या मोठी असल्याने अजगरासारखे प्राणी या जंगलात वास्तव्यास आहेत. दरम्यान या शेतक-याने सर्पमित्राला या घटनेची माहिती दिली. सर्पमित्र घटनेच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अजगराने संपूर्ण शेळीच गिळंकृत केली होती. सर्पमित्र क्रांती बुद्धेवार आणि त्याच्या सहका-यांनी या अजगराला पकडले. या बारा फुटाच्या अजगराला सुरक्षितरित्या पकडून जंगलात नेऊन सोडण्यात आले. मात्र ते शेळीचे अजगराच्या तावडीतून सोडवू शकले नाहीत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या