39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeक्राइमशाळकरी मुलाला संपवत झाडाला टांगला मृतदेह

शाळकरी मुलाला संपवत झाडाला टांगला मृतदेह

एकमत ऑनलाईन

बीड : माझ्या शेतातून कशाला जातोस म्हणत अवघ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्या मुलाने आत्महत्या केली असे वाटावे यासाठी ओढणीच्या साहाय्याने झाडाला टांगल्याची खळबळजनक घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत काल सकाळी उघडकीस आली आहे.

नित्रुड येथील इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी गुलाम मोहम्मद मुर्तजा शेख हा १५ वर्षीय मुलगा त्याची लहान बहीण सिमरन आणि छोटा भाऊ असेफर यांना सोबत घेऊन आपल्या आजोबांच्या शेतात मंगळवारी सकाळी सात वाजता सरपण आणण्यासाठी गेला होता. शेतात जात असताना दत्ता माणिक डाके यांच्या शेतात कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे या तिघांनी त्याचा रस्ता अडवला.

आमच्या शेतातून का जातोस म्हणत गुलामला त्यांनी जमिनीवर पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघेजण गुलामचा गळा आवळत असताना घाबरलेल्या सिमरन आणि उसेफर याने घराकडे पळ काढला. घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. गुलामचे वडील मुर्तजा शेख यांच्यासह नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

यावेळी पालखी महामार्गावरील नेतृत्व पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकवलेल्या अवस्थेत नातेवाईकांना आढळला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या