23.2 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeक्रीडारोनाल्डोच्या पोर्तुगीज संघाला धक्का

रोनाल्डोच्या पोर्तुगीज संघाला धक्का

एकमत ऑनलाईन

दोहा : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या संघाला दक्षिण कोरियाने पराभूत केले. त्यामुळे फुटबॉल विश्वासाठी हा फार मोठा धक्का आहे. यासोबतच आणखी एक धक्का बसला असून, दुस-या सामन्यात उरुग्वे आणि घाना यांच्यातील सामना चांगलाच रंगला. उरुग्वेने हा सामना २-० असा जिंकला, पण हा सामना जिंकूनही उरुग्वेला गोल फरकांच्या जोरावर या विश्वचषकामधून बाहेर पडावे लागले.

पोर्तुगालने या सामन्याची धडाकेबाज सुरुवात केली होती. कारण या सामन्याच्या पाचव्या मिनिटालाच पोर्तुगालच्या रिकॉर्डो होर्टाने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर पोर्तुगालचा संघ जवळपास २० मिनिटे आघाडीवर कायम होता. पण त्यानंतर कोरियाने गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. कोरियाच्या किम योंग गोनने यावेळी कोरियासाठी पहिला गोल केला.

त्यानंतर मध्यंतरापर्यंत हा सामना १-१ असा बरोबरीत होता. या सामन्याच्या दुस-या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार तयारी केली. पण दोन्ही संघांना यावेळी ९० मिनिटे पूर्ण होईपर्यंत एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत राहील, असे वाटत होते. पण कोरियाच्या वँग ही चॅनने सामन्याच्या ९१ व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. कोरियाने ही आघाडी कायम ठेवली आणि त्यांनी पोर्तुगालवर शानदार विजय मिळवला.

उरुग्वेच्या संघाने यावेळी घानावर २-० असा दमदार विजय मिळवला. उरुग्वेच्या अरासकाएताने यावेळी सामन्याच्या २६ व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर पुन्हा एकदा अरासकाएता संघासाठी धावून आला. कारण अरासकाएताने त्यानंतर सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला गोल केला आणि संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुस-या सत्रात या सामन्यात एकही गोल झाला नाही. त्यामुळे हा सामना उरुग्वेने २-० असा जिंकला. पण हा सामना जिंकूनही उरुग्वेला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. कारण साखळी गटात दक्षिण कोरियाने उरुग्वेपेक्षा जास्त गोल केले होते. त्यामुळे या गोल फरकाच्या जोरावर उरुग्वेला विश्वचषकातील आव्हान कायम राखता आले नाही.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या