23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeभूगर्भातील आवाजाचा भारतीय भू-विज्ञान संस्थेद्वारा होणार अभ्यास

भूगर्भातील आवाजाचा भारतीय भू-विज्ञान संस्थेद्वारा होणार अभ्यास

एकमत ऑनलाईन

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील हासुरी गावातील नागरिकांनी घाबरू नये. भूकंप मापन केंद्रात भूकंपाची नोंद झाली नाही. पण गावात भुगर्भातून आवाज येत आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने भारतीय भू-विज्ञान संस्था नागपूर आणि भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभाग नवी दिल्ली यांच्याशी संपर्क साधून हासुरी गावात भेट देण्याची विनंती केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी मंगळवारी गावाक-यांच्या समोर दिली.

निलंगा तालुक्यातील हासोरी या गावात मागील ६ सप्टेंबरपासून भूकंप सदृश्य आवाज व धक्के जाणवत असल्याबाबत नागरिकांनी महिती दिली होती. यासंदर्भात दि. ९ सप्टेंबर रोजी प्रभारी अधिकारी भूकंप वेधशाळा हवामानशास्त्र विभाग लातूर आणि वरिष्ठ व वैज्ञानिक पूजन सर्वेक्षण विभाग लातूर यांनी हासूरी गावात भेट देऊन पाहणी केली होती. भारतीय हवामान खात्याचे भूकंप वेध शाळा लातूर येथे भूकंपाची नोंद झाली नव्हती. यासंदर्भात अतिरिक्त अभ्यास होण्याची आवश्यकता असल्याबाबत शास्त्रज्ञांची म्हणणे आहे, त्याकरिता भारतीय भू-विज्ञान संस्था नागपूर आणि भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभाग नवी दिल्ली यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पत्रव्यवहार करण्यात येऊन त्यांच्या तज्ञांचे पथक हासोरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे.

नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोडवे, वरिष्ठ व वैज्ञानिक एस. बी. गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, सहायक भूवैज्ञानिक जिल्हा परिषद लातूर प्रदीप नागरगोजे, येलाले, गटविकास अधिकारी निलंगा व ईतर तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या