34.4 C
Latur
Sunday, April 2, 2023
Homeमहाराष्ट्रदुचाकीचा भीषण अपघात; १ ठार, ३ जखमी

दुचाकीचा भीषण अपघात; १ ठार, ३ जखमी

एकमत ऑनलाईन

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. दुचाकीच्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरात हा अपघात घडला. दुचाकी आणि छोट्या लोडिंग गाडीमध्ये झालेला हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

दिलीप उदयभान जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर जाधव यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव महामार्गावर गोळेगाव धोत्रा फाटा परिसरात दुचाकी आणि छोट्या लोडिंग रिक्षाचा अपघात झाला.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या