24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; तरुणी जागेवर ठार; तिघेजण गंभीर

मुंबईकडे येणाऱ्या गाडीचा भीषण अपघात; तरुणी जागेवर ठार; तिघेजण गंभीर

एकमत ऑनलाईन

टायर फुटल्यामुळे वेगात गाडी बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली

रायगड, 29 मे : राज्यात लॉकडाऊनदरम्या अनेक भीषण अपघात घडले. असाच धक्कादायक अपघात रायगड – मुंबई गोवा महामार्गावर घडला आहे. तवेरा गाडीचा टायर फुटून गाडी दुभाजकावर आदळली. यामध्ये एक तरुणी जागेवर ठार झाली तर तिघेजण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमरापूर पुलावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 5 वर्षांची चिमुरडी बचावली आहे तर तिच्यासोबत असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची पोलिसांना माहिती देण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे. अपघात धडताच स्थानिकांनी तात्काळ जखमींना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तिथे तिघांवर उपचार सुरू आहेत.

Read More  Aadhaar च्या मदतीनं फक्त 10 मिनिटांमध्ये बनेल तुमचं Pan Card, अर्थ मंत्र्यांनी सुरू केली सुविधा

ही गाडी कुडाळ इथून मुंबईकडे निघाली होती. रस्त्यात टायर फुटल्यामुळे वेगात गाडी बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे मोठा हादरा बसला. यामध्ये गाडीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. तर अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी अपघाताची चौकशी करत असून नेमक्या घटनेची चौकशी करत आहेत. रस्त्याच्या मधे असलेलं अपघाती वाहन बाजूला करण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या