25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeइंदापूरमधील शेतात शिकाऊ विमान कोसळले

इंदापूरमधील शेतात शिकाऊ विमान कोसळले

एकमत ऑनलाईन

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात येथे कारवार एव्हीएशनचे विमान कोसळले. या अपघातात पायलट भाविका राठोड किरकोळ जखमी झाली आहे. बारामतीतील कार्व्हर एव्हीएशन मार्फत प्रशिक्षण दिले जाते. सकाळी विमानाने बारामतीतून उड्डाण केल्यानंतर विमान खाली कोसळले.

हे विमान विमानातील इंधन संपल्यामुळे कोसळले आहे. यामध्ये महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या घटनास्थळी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त घटना ठिकाणी ठेवला आहे. हे विमान दादाराम आबाजी बारहाते यांच्या शेतात कोसळले.

नक्की काय घडले?
बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत पायलट प्रशिक्षण दिले जाते. याच विमानाचा शिकाऊ पायलट भाविका राठोड सराव करत होत्या. त्यानुसार सकाळी बारामतीतून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र काहीच वेळानंतर तांत्रिक अडचण जाणवू लागली. अचानक विमानातील इंधन संपले आणि विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावातील शेतात कोसळले. बारहाते याचे हे शेत होते. या अपघातात जखमी झालेल्या भाविका या कार्व्हर एव्हिएशनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या