18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे ट्रकभर कागदपत्रे दाखल

ठाकरे गटाचे ट्रकभर कागदपत्रे दाखल

एकमत ऑनलाईन

पक्ष, चिन्हाची लढाई आता निर्णायक टप्प्यात
नवी दिल्ली : शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटातील लढत आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. कारण ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ट्रक भरून कागदपत्रे निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली आहेत. आजच्या एका दिवसातच १ लाख १० हजार शपथपत्र दाखल केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला.

निवडणूक आयोगाने २३ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठीची मुदत दिली आहे, तोपर्यंत दोन्ही गटांकडून पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही गटांकडून कागदपत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगात या कागदपत्रांची छाननी केली जाईल, त्यानंतर निवडणूक आयोग गरज पडली तर संबंधित व्यक्तींना बोलवूनही घेऊ शकते. राज्यातल्या महापालिका निवडणुका पेंडिंग आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही तर या निवडणुका दोन्ही पक्षांना मशाल आणि ढाल-तलवार यावर लढवाव्या लागू शकतात.

शिवसेना कुणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लागली. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावे दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले.

बिहारमध्येही एलजेपीवरून चिराग पासवान आणि पशुपतीकुमार पारस यांच्यात वाद झाला. हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला, पण वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला तरीही याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यावेळीही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या