23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रबायकोची भुताटकी घालविण्यासाठी घरात टांगले गिधाड

बायकोची भुताटकी घालविण्यासाठी घरात टांगले गिधाड

एकमत ऑनलाईन

नाशिक : आपल्याकडे कितीही कठोर कायदे असले तरी अद्याप समाजाच्या मानगुटीवरून अंधश्रद्धेचे भूत काही उतरताना दिसत नाही. असाच धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. बायकोचे आजारपण दूर करण्यासाठी नव-याने चक्क गिधाडाचे अवयव घरात टांगल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भोंदूबाबाच्या सल्ल्यानुसार गिधाडाची हत्या करून त्याचे अवयव घरात टांगण्यात आले होते. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने मांत्रिकाच्या सांगण्यावरून धक्कादायक प्रकार केला आहे. तुझ्या बायकोला भुताटकीने झपाटले आहे. त्यामुळे त्यावर उपाय करावा लागेल. त्यासाठी गिधाडाची शिकार करून घरात ठेव असे मांत्रिकाने सांगितले होते. यावरून आरोपी पतीने गिधाडांची शिकार करून घराच्या बाहेर काही अवशेष टांगल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आठवडाभरापूर्वी बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणी काही संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यातील एका संशयिताच्या घरात हा प्रकार घडला आहे. बिबट्याची शिकार करून त्याची कातडी काढून हळद, मीठ, तेल लावून घरात जतन करून ठेवल्याचा प्रकार घडला होता. तस्करांच्या मुसक्या बांधल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. १७ लाखांत कातडीचा सौदा करण्यास निघालेल्या पालघर जिल्ह्यातील या तस्करांना इगतपुरीतील वनविभाग पथकाने ताब्यात घेतले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या