29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी, राहुल-सूर्याची जिगरबाज खेळी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी सलामी, राहुल-सूर्याची जिगरबाज खेळी

एकमत ऑनलाईन

 गोलंदाजांचाही अचूक मारा

थिरुअनंतपुरम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवित मालिका विजयाचे आज घट बसवल्याचे पाहायला मिळाले. गोलंदाजांच्या अचूक मा-यामुळे दक्षिण आफ्रिकेला भारतापुढे १०७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याने भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुल तळपला आणि त्यांनी आपली नाबाद अर्धशतके झळकावली व संघाला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा यावेळी शून्यावर बाद झाला, त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीलाही फक्त तीन धावा करता आल्या. त्यावेळी भारताची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचे समीकरणच बदलून टाकले. सूर्यकुमारने सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केली. त्यामुळेच भारताच्या संघावरचे दडपण हलके झाले आणि त्याना विजय मिळवता आला.

तत्पूर्वी, दीपक चहरने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला आणि पहिल्या सलामीवीराला तंबूत धाडले. पण त्यानंतर दुस-या षटकात तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची संपूर्ण हवाच निघून गेली. कारण दुस-याच चेंडूवर अर्शदीप सिंगने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डीकॉकला बाद केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. अर्शदीप फक्त या एका विकेटवर थांबला नाही. या षटकात अजून दोन विकेट्स त्याने मिळविल्या. अर्शदीपने दुस-या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिली सोरोवला बाद केले. त्यानंतर त्याने या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलरला बाद केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची ४ बाद ८ अशी दयनीय अवस्था झाली.

अर्शदीपने सलग दोन विकेट्स काढल्या. त्यामुळे पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याला हॅट्ट्रिक मिळवण्याची संधी होती. पण भारतीय संघ फक्त या एकाच गोष्टीवर थांबला नाही. कारण त्यानंतरच्या षटकातही भारतीय संघाला यश मिळाले. त्यामुळे निर्धारित षटकात दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १०६ धावाच करता आल्या. मात्र, माफक आव्हान असतानाही भारताच्या दोन विकेट लवकर पडल्याने दडपण वाढले होते. तथापि, सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुल यांच्या जीगरबाज खेळीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या