28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत तरुणाने पळविले विमान

अमेरिकेत तरुणाने पळविले विमान

एकमत ऑनलाईन

मिसिसिपी : अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये २९ वर्षीय युवकाने विमान पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता त्या विमानाचा पायलट मिसिसिपीतील वॉलमार्टच्या स्टोअरमध्ये विमान घुसवण्याची धमकी देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

अमेरिकेतील मिसिसिपी राज्यात हा प्रकार घडला आहे. मिसिसिपी पश्चिममध्ये एका विमानाचा पायलट वॉलमार्टच्या स्टोरअरवर विमान आदळवण्याची धमकी देत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्या पायलटसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. टुपेलो पोलिसांनी त्या भागातील सर्व दुकाने आणि लोकांना परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी सर्व आपत्कालीन सेवांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी नागरिकांना त्या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. जोपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत नागरिकांनी त्या भागात जाऊ नये, असे सागंण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या