21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयसर्पदंशाने मृत्यू झालेल्या भावाच्या अन्त्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणालाही सर्पदंश

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या भावाच्या अन्त्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणालाही सर्पदंश

एकमत ऑनलाईन

पाटणा : एक अतिशय धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यात सर्पदंशाने दोन भावांचा मृत्यू झाला आहे. सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाल्यानंतर अन्त्यविधीसाठी गेलेल्या भावालाही सापाने दंश केला. यात त्याचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्याला दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील बलरामपूर येथे ही घटना घडली असून दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सर्कल अधिकारी राधे रमन सिंगग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय अरविंद मिश्रा यांचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा (वय २२) अन्त्यविधीसाठी गावात आला होता. मात्र, भावाच्या अन्त्यविधीसाठी आलेला असताना मंगळवारी त्यालाही सापाने दंश केला आणि त्याचेही निधन झाले.

भावाच्या अन्त्यविधीसाठी आलेल्या गोविंदला झोपेत असतानाच सापाने दंश केला. गोविंदसोबत त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला, अशी माहिती रमन सिंग यांनी दिली आहे. गोविंदला रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती असे अधिका-याने सांगितले आहे.

वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिका-यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचे आश्वासन दिले आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिका-यांना केली आहे. मात्र, सापाच्या दंशाने एकाच घरातील दोघांचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या