Tuesday, October 3, 2023

रेमडेसिवीरसाठी आता आधारकार्डची सक्ती

मुंबई : कोरोनाच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याच्या सूचना मुंबई शहराचे पालकमंत्री आणि मंत्री अस्लम शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तांना केल्या आहेत. यापूर्वी कोरोनावरील उपचारातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने (सीडीएससीओ) राज्यांच्या औषध प्रशासनाला परिपत्रकाद्वारे दिले होते.

रेमडेसिवीर औषधाचा फार मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याच्या बातम्या गेले काही दिवस प्रसारीत होत होत्या. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अस्लम शेख म्हणाले की, रेमडिसिवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ज्या रुग्णांना रेमडेसिवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणेही रुग्णालयांना बंधनकारक असेल. तसे न झाल्यास त्यावर त्वरित फौजदारी गुन्हा दाखल होईल, असा इशाराही त्यांनी दिला. कोरोनावर सध्या ठोस असे कोणतंही औषध आलेलं नाही. परंतु रेमडेसिवीर या औषधाचा अनेकांना उपयोगही होत आहे. परंतु ठराविक कंपन्यांनाच औषधाच्या निर्मितीची मान्यता दिल्याने या औषधांचा तुडवडा जाणवत होता. परंतु येत्या काही दिवसांत हा तुडवडा कमी होईल, असेही ते म्हणाले.

वाढीव किमतीत औषध विक्री!
हेट्रो हेल्थकेअरच्या इंजेक्शनची किंमत ५४०० रुपये प्रतिकुपी असून अगदी १५ ते ६० हजारापर्यंत दराने विक्री केल्याची तक्रार लोकल सर्कल या संस्थेने सीडीएससीओकडे केल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले होते. छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. तसेच असे आढळल्यास थेट कारवाई करून कळविण्याचे पत्रकात स्पष्ट केले करण्यात आले होते.

रुग्णालय, मेडिकलवर मंत्र्यांची धाड
४कोरोनाच्या रुग्णांसाठी वरदान ठरणाºया रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि याची चढ्या भावात विक्री केली जातेय, या पार्श्वभूमीवर सत्याची पडताळणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईत काही रुग्णालयांवर आणि मेडिकल दुकानांवर धाडी टाकल्या. सोबतच त्यांनी औषधसाठ्याची पाहणी केली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या