नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली. आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला.
आम आदमी पार्टीकडून शैली ओबेरॉय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
तर भाजपकडून रेखा गुप्ता यांनी उमेदवारी दाखल केली होती. महापौर निवडीत ‘आप’च्या उमेदवार शैली ओबेरॉय यांचा विजय झाला.
शैली ओबेरॉय यांना १५० मतं मिळाली तर भाजप उमेदवार रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली. महापौर म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. शैली ओबेरॉय यांनी आपण सभागृह संविधानानुसार चालवू असे आश्वासन दिले. आपण सर्व सभागृहाची गरिमा राखून काम करू, अशी मला आशा असल्याचे ओबेरॉय म्हणाल्या.
आप उमेदवाराच्या निवडीनंतर आमदार सौरभ भारद्वाज म्हणाले की, आज गुंडागर्दीचा पराभव झाला असून जनतेचा विजय झाला आहे. भाजप लबाडी करून त्यांचा महापौर बसवणार होता. परंतु तसे झाले नाही. मी शैली ओबेरॉय यांना शुभेच्छा देतो, असे भारद्वाज म्हणाले.