पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपने दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच या निवडणुकीत आम आदमी पक्षाची एन्ट्री झाली आहे.
दिल्लीनंतर पंजाब जिंकणारा आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवाय ‘आप’ने पोटनिवडणुकीतून एन्ट्री करण्याचे निश्चित केले आहे. वास्तविक ‘आप’ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र ‘आप’कडून सध्या पोटनिवडणुकीसाठी देखील मुलाखती घेण्यात येत आहेत.
‘आप’ने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ९ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यासाठी पक्ष सज्ज झाला आहे. निवडणुकीसंदर्भातील ‘आप’चे प्रभारी इटालिया हे पुण्यातील नेते आणि पदाधिका-यांसोबत चर्चा करत आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.