19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रभन्नाट व्हिडिओ....पिया तुऽऽऽ नानी डान्स

भन्नाट व्हिडिओ….पिया तुऽऽऽ नानी डान्स

एकमत ऑनलाईन

मुंबई : आजीबाई, नानीबाई डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नृत्याला कसल आलय वय…कुणाचा कसलाही विचार न करता थेट रस्त्याच्या कडेला आजीबाई भन्नाट थिरकल्या आहेत.

प्रसिद्ध गायीका आशा भोसलेंचे प्रसिद्ध गाणं पिया तू अब तो आजा या गाण्यावर भररस्त्यात चाललेला हा डान्स पाहण्यासारखा झाला आहे. या व्हिडीओवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. १५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दोन महिला पिया तू अब तो आजा या हेलनच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहे. आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आजही एव्हरग्रीन आहे. त्यामुळे हे गाणं लागलं की पाय आपोआप थिरकतात.

हा व्हिडीओ आतापर्यंत १ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर खूप भारी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर यांचं वयही कळत नाही पण खूप छान नाचण्याची कला यांच्यात आहे. तर काही युझर्सनी या मनमुक्तपणे आपला डान्स करण्याचा आनंद घेत असल्याचंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता गाणं सुरू होताच दोन वृद्ध महिला भन्नाट डान्स करायला सुरुवात करतात. सुरुवातीला यांच्यासोबत एक-दोन जण आणखीन नाचतात मात्र नंतर ते बाजूला होतात आणि या दोन महिला मात्र मनमुरादपणे रस्त्यात नाचत असतात. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या