22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रअबब..! झोपडीत राहण-याला १ लाखाचे विज बिल

अबब..! झोपडीत राहण-याला १ लाखाचे विज बिल

एकमत ऑनलाईन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जिवती या गावात झोपडीत राहणा-या शेतक-याला लाखो रुपयांचे विज बिल आल्याने महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला आहे. जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके या शेतक-याला एक लाख ३८० रूपयाचे वीज बिल आले आहे.

कुडाच्या घरात एकही विद्युत उपकरण नाही, तरीही महावितरणने पाठवलेले वीजबिल पाहून शेतक-याला धक्का बसला. यावरून महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. येथे केशवराव भिमू कोटनाके यांचे कुडाचे छोटेसे घर आहे. घरात कोणतंही विद्युत उपकरण नाही. केवळ वीजेचे दोन बल्ब आहेत.

तरीही महावितरणकडून या शेतक-याला एका महिन्याचे वीज बिल तब्बल १ लाख ३८० रूपये पाठविण्यात आले आहे. वीजबिल पाहताच कोटनाके यांना मोठा धक्का बसला. त्वरीत त्यांनी महावितरण कार्यालय गाठले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या