24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयअबब..! ग्राहकाला आले तब्बल ३,४१९ कोटी रुपयांचे वीज बिल!

अबब..! ग्राहकाला आले तब्बल ३,४१९ कोटी रुपयांचे वीज बिल!

एकमत ऑनलाईन

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वीज बिल कंपनीकडून एक अजब घटना घडली आहे. येथे राहणा-या प्रियंका गुप्ता यांना तब्बल ३,४१९ कोटी रुपयांचे वीज बिल आले आहे. वीज बिलाची ही अवाढव्य किंमत ऐकल्याने गुप्ता यांना धक्का बसला असून त्यांचे सासरे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारकडून चालवल्या जाणा-या वीज कंपनींवर नागरिकांनी ‘मानवी त्रुटी’ म्हणून ठपका ठेवला आहे. त्यानंतर शहरातील शिव विहार कॉलनीत राहणा-या गुप्ता कुटुंबाला १३०० रुपयांचे योग्य ते बिल देत दिलासा दिला आहे. वीज बिल कंपनींच्या या व्यवहारामुळे नागरिक संतापले आहेत. वीज कंपनींच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.

गुप्ता यांचे पती संजीव कांकणे यांनी सांगितले की, जुलै महिन्याच्या वीज बिलातील घरगुती वापराची रक्कम पाहून वडील आजारी पडले आहेत. ठराविक रकमेत येणारे बिल अचानक कोटी रुपयांत आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. २० जुलै रोजी दिलेले वीज बिल मध्य प्रदेशातील विद्युत वितरण कंपनीच्या पोर्टलद्वारे क्रॉस व्हेरिफाय केले होते. त्या वीज बिलाची किंमत योग्य होती. नंतर राज्य वीज कंपनीने ते बिल दुरुस्त केल्यानंतर त्याची किंमत वाढलेली आली.

या प्रकरणी वीज कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन मांगलिक यांनी, अवाढव्य वीज बिल वाढवण्यावरून मानवी चुकांचा ठपका ठेवत संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या कर्मचा-याने वापरलेल्या युनिट्सऐवजी सॉफ्टवेअरमध्ये ग्राहक क्रमांक प्रविष्ट केला की जास्त रकमेचे बिल येण्याची शक्यता असते.

त्यामुळे वीज ग्राहक गुप्ता यांना योग्य ते १,३०० रुपयांचे योग्य बिल देण्यात आले आहे. या घटनेत वीज बिलातील झालेली त्रुटी सुधारण्यात आली असून संबंधित कर्मचा-यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री प्रद्युम्नसिंह तोमर यांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या