22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रजंगलात बोलावून व्यापा-याचे अपहरण

जंगलात बोलावून व्यापा-याचे अपहरण

एकमत ऑनलाईन

धुळे : आमच्याकडे चांगल्या प्रतीचे तांबे असून ते विकायचे आहे, असे आमिष दाखवून जंगलात बोलावलेले उत्तराखंड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांचे आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर १० लाखांची खंडणी मागितली गेली आणि नंतर यू टर्न घेत अपहरणकर्त्यांनी त्यांची सिनेस्टाईल सुटकाही करण्यात आली.

पोलिसांनी शस्त्रांसह जंगल गाठून अग्रवाल यांची सुटका केली. परंतु खंडणीखोर मात्र पसार झाले. चित्रपटातील पटकथेला साजेशी घटना पोलिसांनी धुळीस मिळवली. आकाश अग्रवाल हे उत्तराखंडमधील देहरादून येथील व्यापारी आहेत. त्यांना उच्च प्रतीच्या तांब्याचे आमिष दाखवून दोंडाईचात बोलवण्यात आले.

यानंतर कथित गणेश नामक व्यक्तीने त्यांना मोटारसायकलवर बसवून डोंगराळे जंगलात नेले. तिथे अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातील एक लाखाचे महागडे घड्याळ व २० हजारांची रोकड लुटण्यात आली. लुटारूंनी अग्रवाल यांचे भागीदार अश्विन तिवारी यांना फोन करून अग्रवाल यांच्या सुटकेसाठी १० लाखांच्या खंडणी मागितली.

तिवारी यांनी त्वरीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने धुळे पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी लगेच डोंगराळेचे जंगल गाठले. शोधमोहीम राबवून अग्रवाल यांची सुटका केली. परंतु खंडणीखोर मात्र पसार झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या