22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत

अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत

एकमत ऑनलाईन

शिक्षण संस्थेतील १२ शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र
औरंगाबाद : टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील समोर आली होती. मात्र सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.

मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सत्तार यांना स्थान देण्यात आले. आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

नेमके काय म्हटले दानवेंनी?
दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही सत्तारांची शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आली होती. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना माझ्याकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या पगाराची कागदपत्रं असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.

चौकशीची मागणी
अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. सोबतच सत्तार यांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असे देखील दानवे यांनी म्हटले आहे. तसेच सत्तार यांच्या मुलीच्या पगाराची कागदपत्रं देखील आपल्याकडे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या