28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांचा आजचा बुलडाणा दौरा रद्द

अब्दुल सत्तारांचा आजचा बुलडाणा दौरा रद्द

एकमत ऑनलाईन

बुलडाणा : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे वादात सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक आंदोलने करण्यात येत आहेत. या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांचा आजचा बुलडाणा जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

अब्दुल सत्तार हे आज सकाळी सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन चांगेफळ येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. परंतु कालपासून राष्ट्रवादीने राज्यभरात ठिकठिकाणी सत्तारांचा निषेध केला आहे. तसेच बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तारांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिल्याने सत्तार यांनी दौराच रद्द केला.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून काल संध्याकाळी अब्दुल सत्तारांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला होता. तसेच आज सत्तार हे जिल्ह्याच्या दौ-यावर येणार असल्याचे सांगण्यात आल्याने राष्ट्रवादीने आक्रमक इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना आठ दिवस कुठल्याच सार्वजनिक ठिकाणी न जाण्याची सूचना केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या अब्दुल सत्तार ‘नॉट रिचेबल’ असून ते आठ दिवस अज्ञातवासात राहू शकतात, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या