25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक

औरंगाबादच्या नामांतरावरून अबू आझमी आक्रमक

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी शिंदे गट, भाजप आणि अपक्ष आमदारांची १६४ मते मिळवत बाजी मारली.

त्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी औरंगाबादच्या नामांतरावरून आक्रमक झाले. त्यावेळी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांना छडी उगारावी लागली.

दरम्यान अबू आझमी म्हणाले, आम्ही आजच्या मतदानात तटस्थ राहिलो, याशिवाय दुसरं करणार काय. आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पण खंत आहे की आदरणीय उद्धव ठाकरेंनी जाता जाता उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नाव बदलले. देश किंवा महाराष्ट्रात परिवर्तन होत असेल तर नाव बदला, इथे तरुणांना रोजगार नाही, विकास होत असेल तर माझा आक्षेप नाही, पण तुम्हाला नाव बदलून काय संदेश द्यायचा आहे?

तुम्ही मुस्लिमांची नावं हटवता का. जुन्या शहरांची नावं बदलून काय होणार? नवी शहरं तयार करा. किती तरी जागा आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने एक मोठं शहर तयार करा, आम्ही टाळ्या वाजवत स्वागत करू. मोठमोठी शहरं बनवा. आज हा देश उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे, असे अबू आझमी म्हणाले. अबू आझमी बोलत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सभागृहातील आमदार देत होते.

दरम्यान, अबू आझमी साहेब, आपण माझ्या अभिनंदनाच्या ठरावावर बोला, असे नार्वेकर म्हणाले. हे मुद्दे मांडण्यासाठी वेगळी आयुधं आहेत ती वापरा, आज पहिला दिवस आहे, माझे अभिनंदन करण्यासाठी आपण उभे आहात, असा माझा समज होता, कृपया आपण त्यावरच बोला, असे नार्वेकर म्हणाले. त्यानंतरही आझमी बोलत असल्याने नार्वेकरांनी त्यांना शांत करत थेट आमदार बच्चू कडू यांना बोलण्याची विनंती केली.

त्याच वेळी भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधवांना कायदाच सांगितला, अबू आझमी यांनी मुसलमानांचे शहर असा उल्लेख आपल्या भाषणात केला. पण नियम सांगा आणि मग बोला असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या