22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे गटातील आमदाराकडून शिवीगाळ

शिंदे गटातील आमदाराकडून शिवीगाळ

एकमत ऑनलाईन

मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. विधिमंडळाच्या पाय-यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भिडल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचीही माहिती आहे.

या सगळ्या राड्याविषयी आमदार अमोल मिटकरी यांनी आपली बाजू मांडत महेश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
महाविकास आघाडीची काल बैठक झाली. या बैठकीत ठरले होते की, सध्या शेतकरी अडचणीत असल्याने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विधिमंडळाच्या पाय-यांवर आज सकाळी साडेदहा वाजता आंदोलन करण्यात यावे.

या आंदोलनासाठी आम्ही विधिमंडळाच्या पाय-यांवर जमलो होतो. आंदोलन शांतपणे सुरू होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार महेश शिंदे यांनी आम्हाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप अमोल मिटकरी यांच्याकडून करण्यात आला आहे.
………….

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या