22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeसोलापूर५० प्रवाशांना घेऊन जाणा-या बसचा चंद्रभागा नदीवर अपघात

५० प्रवाशांना घेऊन जाणा-या बसचा चंद्रभागा नदीवर अपघात

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवरून जात असताना एसटी बसचा अपघात झाला आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरच्या अंबाबाई पटांगणाजवळच्या नवीन पुलावर घडली. बसमधील सर्व ५० प्रवासी सुखरूप आहेत. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

कोल्हापूर आगाराची एसटी बस माजलगावहून कोल्हापूरकडे जात असताना हा अपघात झाला. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवर बसचे पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली. यात बस पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळली. यादरम्यान चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आज पहाटे सहाच्या सुमारास ही बस निघाली असता अंबाबाई पटांगणातील नवीन पुलावर अचानक बसचे टायर फुटले. यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस कठड्याच्या दिशेने गेली. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे ही बस पुलावर असलेल्या कठड्यावर धडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या बसमध्ये पन्नास प्रवासी होते. जर या पुलाला लोखंडी बॅरिकेटिंग आणि कठडे नसते तर बस नदीत कोसळली असती. बसचालकानेही सतर्कता दाखवल्यामुळे ५० प्रवाशांचा जीव वाचला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या