22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्र गोंदिया-धापेवाडा-तिरोडा राज्यमार्गावर भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

 गोंदिया-धापेवाडा-तिरोडा राज्यमार्गावर भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

गोंदिया : राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना गोंदियामध्ये आणखी एका भीषण अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गोंदिया-धापेवाडा-तिरोडा राज्यमार्गावर दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या महालगाव/मुरदाडा गावाजवळ आज १५ जून रोजी ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे
.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १०.३० च्या सुमारास झालेल्या ट्रक आणि ट्रॅक्टरच्या भीषण अपघात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. संतप्त नागरिकांनी ट्रकला आग लावली आहे. यामुळे कामाच्या वेळी मोठी वाहतूक कोंडीही झाल्याचे पाहायला मिळाले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने विरुध्द दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. यात ट्रॅक्टर ट्रकच्या खाली आल्याने ड्रायव्हरसह चार हमालांचा या अपघातात मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चार मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांना शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या