25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रपुणे-नगर हायवेवर अपघात, पाच जणांचा मृत्यू

पुणे-नगर हायवेवर अपघात, पाच जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे-अहमदनगर मार्गावर रात्री दीड वाजता झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. एका कंटेनर आणि कारच्या अपघातामध्ये कारने प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी पाचजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती पोलीस महानिरिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली आहे.

विरुद्ध दिशेने प्रवास करत असणारा कंटेनर रस्त्यच्या मध्य भागी आला आणि त्याचवेळी समोरुन येणा-या कारने या कंटेनरला धडक दिली. यामध्ये कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात मरण पावलेल्यांमध्ये संजय म्हस्के (५३), राम म्हस्के (४५) या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या अपघातत सात वर्षांचा राजू म्हस्के, चार वर्षांची हर्षदा म्हस्के आणि १६ वर्षीय विशाल म्हस्केचाही दुर्दैवी अंत झाला आहे.

या अपघातामध्ये कारमधील साधना म्हस्के या गंभीर जखमी झाल्या आहेत. साधना यांचे पती राम यांच्यासहीत दोन्ही मुलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या कंटेनरचा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय म्हस्के हे नगरहून पुण्याकडे कारने येत होते.

यावेळी एक कंटेनर विरुद्ध दिशेने व चुकीच्या बाजूने येत होता. कारेगावच्या हद्दीतील हॉटेल एस नाईनसमोर त्याने समोरुन कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात मोटारीमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. त्यांना पोलिसांनी तातडीने रुग्णावाहिकेतून रुग्णालयात नेले. परंतु, त्यांच्यातील ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या