19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर अपघात, ३ ठार

समृद्धी महामार्गावर अपघात, ३ ठार

एकमत ऑनलाईन

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला सुरूच आहे. आज सकाळी ७ वाजता समृद्धी महामार्गावरील मेहकर-जालना रोडवर एका कारने दुस-या कारला मागून धडक दिली. या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

समृद्धी महामार्गावर सकाळी औरंगाबादहून नागपूरच्या दिशेने दोन कार निघाल्या होत्या. यावेळी समृद्धी महामार्गावर बीबी ते शिवनीपिसा गावाजवळ कार (क्रमांक एमएच ४९ बीआर ६०८२) ही मेहकरपासून काही अंतरावर पुढे जात असताना दुसरी कार यांच्यात धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. कारमध्ये झालेल्या या भीषण अपघातातील मृतांची नावे समोर आली आहेत. गौरव खडसने, सनवी सोनटक्के आणि अमित खेरकर अशी मृतांची नावे आहे. हे तिघेही नागपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर तात्काळ महामार्ग पोलिस पीएसआय गजानन उज्जैनकर, गोविंदा उबरहंडे, हरी ओम काकडे, विठ्ठल काळुसे, संदीप किरके, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान नितीन पवार, जयकुमार राठोड, क्यूआरव्ही कर्मचारी अविनाश मकासरे, रुस्तुम कुट्टे, कैलास जखमी रुग्णवाहिकेच्या १०८ क्रमांकाच्या डॉ. दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले व अपघातग्रस्त वाहन दुसरबीड इंटरचेंज येथे आणले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या