22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयलष्करी वाहनाला अपघात; ७ जवान शहीद

लष्करी वाहनाला अपघात; ७ जवान शहीद

एकमत ऑनलाईन

परतापूर : लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये एका लष्करी वाहनाला झालेल्या अपघातात तब्बल ७ जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण गंभीर जखमी झालेत. जखमींपैकीही अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडमध्ये पाठवण्यात येत आहे.

लष्कराच्या माहितीनुसार, हे जवान परतापूरहून हनीफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टकडे जात होते. पण, रस्त्यातच त्यांचे वाहन श्योक नदीत कोसळले. त्यानंतर सर्वच २६ जवानांना तातडीने लगतच्या आर्मी फिल्ड रुग्णालयात हलवण्यात आले. त्यात ७ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेह येथून परतापूरकडे सर्जिकल पथक पाठवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या