25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्लासवरून परतणा-या तरुणीचा अपघाती मृत्यू

क्लासवरून परतणा-या तरुणीचा अपघाती मृत्यू

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक येथे सीईटीचा क्लास संपवून घरी जाणा-या तरुणीच्या दुचाकीला अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात आणखी दोन जणी जखमी झाल्या आहेत.

साक्षी अनिल खैरनार असे अपघातात मृत्यू झालेल्या २० वर्षीय तरुणीचे नाव आहे. नांदूर शिंगोटे तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील तीन विद्यार्थिनी सीईटी क्लासला गेल्या होत्या. त्यांचा क्लास संपल्यानंतर त्या घरी येत होत्या. या दरम्यान, त्यांची दुचाकी एका उभ्या ट्रकला धडकली आणि या अपघातामध्ये एकीचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ बचावकार्यही केले. याप्रकरणी नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्र आणि महामार्ग पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातातील तरुणीच्या मृत्यूमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी अनिल खैरनार हिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. यानंतर तिने सीईटीचा क्लास लावला होता. यासाठी ती व तिच्या दोन मैत्रिणी संगमनेर येथे सीईटी क्लासला गेल्या होत्या. क्लास संपल्यानंतर त्या परत घरी येत होत्या.

मात्र, त्यांची दुचाकी ही भरधाव वेगात होती. ही भरधाव दुचाकी खंडोबा मंदिर परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली आणि भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात साक्षी खैरनार या तरुणीचा मृत्यू झाला तर तिच्या दोन मैत्रिणी या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी घडली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या