18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्र‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू...

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरुळे-जाधव हिचा अपघाती मृत्यू…

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डम्परने धडक दिल्याने मृत्यू झाला.

कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल सुरू केले होते. यावेळी हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डम्परने धडक दिल्याने मृत्यू झाला.

कोल्हापूर-सांगली महामार्ग पूर्णत: खड्ड्यात गेल्याने मृत्यूचाच सापळा झाला आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी आतापर्यंत निष्पाप जिवांचा बळी गेला आहे. अनेक ठिकाणी रस्ताच उखडल्याने पॅचवर्कची ठिगळे काय कामाची? अशी परिस्थिती आहे. विविध संघटनांकडूनही या रस्त्यासाठी आंदोलने करण्यात आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या