21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीरक्षाबंधन साजरे करून परतणा-या दोन भावांचा अपघाती मृत्यू

रक्षाबंधन साजरे करून परतणा-या दोन भावांचा अपघाती मृत्यू

एकमत ऑनलाईन

परभणी : येथून जवळच असलेल्या पोलिस स्टेशन दैठणा हद्दीत ताडपांगरी जवळ मोटारसायकल व कार अपघातामध्ये दोघे सख्खे मावस भाऊ जागीच ठार झाल्याची घटना मंगळवार दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

मोटारायकलवरील ठार झालेले दोन्ही युवक रक्षाबंधन सण साजरा करून गावी परत जात असताना ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच महामार्ग टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातात मोटारसायकलचा चुराडा झाला असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालम तालुक्यातील नावा येथील शंकर प्रल्हाद मुलगीर व अवधूत बबन भुसनर राहणार हटकरवाडी तालुका पूर्णा हे दोघे सख्खे मावस भाऊ खळी येथे रक्षाबंधनासाठी आले होते. रक्षाबंधन सण साजरा करून हे दाघेही हटकरवाडी येथे जात होते. या दोघांची दुचाकी एमएच २२ एएक्स ६५२५ ताडपांगरी जवळ आली असता कार क्रमांक एमएच २२ एएन ०७०७ शी जोरदार धडक झाली. हा अपघातात एवढा जबरदस्त होता की दुचाकीवरील दोघेही सख्खे मावस भाऊ जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकीचा संपूर्णत: चुराडा झाला आहे.

या अपघाताची माहिती समजाताच महामार्ग टॅबच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे यांनी पोलीस हवालदार शाम काळे, सुरेश टाकरस, संजय पुरी, सुरेश टिपरसे आदीसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलगीर व भुुसनर या दोघा सख्ख्या मावस भावांचा मृतदेह परभणी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अर्चना करपुडे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या